कोथिंबीर आणि कोबीची थालिपीठ | Khothimbir aani kobichi Thalipeeth

Khothimbir aani kobichi Thalipeeth in english   वेळ:   १५ मिनिटे, २ व्यक्तींसाठी.  साहित्य : १) २ वाटया कणिक   २) दीड  वाटी ...

 वेळ:  
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी. 

साहित्य:

१) २ वाटया कणिक  
२) दीड  वाटी चिरलेली कोथिंबीर व किसून घेतेलेला कोबी 
३) १ छोटा चमचा जिरे  
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ 
५) १ छोटा चमचा लाल तिखट
६) हळद 
७) मिठ चवीनुसार 
८) आलं  लसुन पेस्ट 
९) १ छोटा चमचा तेल
१०) लोणी / बटर


कृती:

एका भांडयात कणिक घेऊन त्यात मिठ, तिळ ,जिरे, आलं लसुन पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, आणि किसलेला कोबी घालून एकजीव करावे . 

आता पाणी घालून नरम पिठ मळून घ्यावे


थोडेसे तेल लावून १० मिनिटे बाजूला करून ठेवावे. म्हणजे चांगले मुरते. 

आता आपल्याला हव्या त्या आकाराचे एकसारखे गोळे करून घ्यावे. 

एक एक गोळा घेवून पोळपाटावर पोळी लाटून घ्यावी. 


तव्यावर हे थालिपीठ दोन्ही बाजूने छान भाजून घ्यावे. 















वरून थोडे लोणी लावावे. 















गरमा गरम खावयास घ्यावे. 


  











हे  थालिपीठ दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात. 

Related

Bread-Thalipeeth 8844758697576425233

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item