Malvani Birdyacha Bhaat(Rice) | Vaal Pulao - Maharashtrian Recipes | बिरडयाचा भात

Birdyacha Bhat in English:

Birdyacha Bhaat or Vaal Pulao (Rice) is a mild bitter-sweet recipe of sprouted vaal cooked in spicy Malvani Masala.The vaal beans are rich source of protien & dietry fibre with B Complex Vitamins.It is low in fat .It is topped with ghee and garnished with grated coconut & chopped corriender leaves whn served hot! Learn the step-by-step procedure here!



बनविण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी

भात बनविण्यासाठी  लागणारे साहित्य:

१) २ वाटया चांगल्या प्रतिचे बासमती तांदूळ
२) दीड वाटी मोड काढून सोलुन घेतलेले बिरडे
३) २ कांदे
४) १ टोमॅटो
५) ३-४ लसणाच्या पाकळ्या 

ingredients 1

फोडणीसाठी लागणारे साहित्य:

१) २-३ चमचे तेल
२) १/२ चमचा मोहरी
३) १/२ चमचा जिरे 
४) ५-६ कढीपत्त्याची पाने
५) चिमुठभर हींग

ह्या भातासाठी लागणारे मसाले:

१) २ छोटे चमचे मालवणी मसाला
२) १/२ छोटा चमचा लाल मिरची पूड
३) १/२ छोटा चमचा गरम मसाला
४) १/२ छोटा चमचा हळद

unnamed

ईतर साहित्य:

१) मीठ चवीनुसार
२) थोडासा गूळ
३) कोथिंबीर बारिक चिरलेली
४) ओल खोबर वरुण वाढणीसाठी
५) साजुक तूप वरुण वाढणीसाठी



कृती:

बिरडे धुवून ६ तास भिजू घालावे.

कपडयात बांधून मोड काढून घ्यावे.

मोड आल्यावर त्यांची साल काढून घ्यावी.


तांदूळ  चांगले धुवून साधारण १/२ तास बाजूला करून ठेवावे. 


कांदा ऊभा पातळ व टोमॅटो बारिक चिरून घ्यावा.

एका जाड बुडाच्या भांडयात तेल गरम करावे त्यात प्रथम मोहरी घालावि एकदा का ती तडतडली की त्यात जिरे, कढीपत्त्याची पाने व हींग घालावा.


लगेचच ऊभा चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या घालाव्या. 


त्यात वर दिलेले सर्व मसाले घालावे व जरा परतून घ्यावे.

नंतर त्यात बिरडे, टोमॅटो व थोडेसे ओले खोबरे घालून १ मिनिटे परतून घ्यावे. 


नंतर बाजूला करून ठेवलेले तांदूळ घालून परतावे.


गरम पाणी व मीठ घालून १५-२० मिनिटे भात शिजू दयावा.



गुळ घालावा.

भात शिजला की वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर व ओल खोबर घालून घ्यावे.

वाढताना वरुन साजुक तूप घालून वाढावा.




Labels : maharashtrian bhat,Valacha bhat, bhat, masala bhat, birde,cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 9217604629345540901

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item