Nevri | नेवरी


वेळ :

२५ मिनिटे

साहित्य:

१)  २ कप तांदुळाचे पीठ 
२)  २ कप ओळ खवलेला नारळ  
३)  दीड कप किसलेला गुळ
४)  वेलची पूड 
५)  २ कप पाणी 
६)  तेल 
)  मीठ चवीनुसार 


कृती:

सारण बनवण्यासाठी गुळ व खोबरे एकत्र करून गरम करण्यासाठी ठेवावे. 

मंद ग्यासवर एकसारखे ढवळावे गुळ वितळलला कि वेलची पूड घालावी ढवळून ग्यासवरून बाजूला करून ठेवावे. 



उकड बनवण्यासाठी एका जाड बुडाच्या भांडयात पाणी गरम करावे.
उकळताना त्यात थोडेसे तेल व मीठ घालावे. 



चांगली उकळी आली कि तांदुळाचे पीठ घालावे, सतत ढवळत राहावे. 



मध्यम आचेवर २-३ मिनिटे उकळू दयावे वरून झाकण ठेवून वाफ काढावी. 

ग्यासवरून  उतरून ५ मिनिटे उकडू  दयावे. 

परातीत उकड काढून मळून घ्यावे आवश्यक वाटल्यात थोडे पाणी व तेल घेवून मळावे. 



या उकडीचे एकसारखे सुपारीएवढे गोळे करावे. 

एक एक गोळा घेवून त्याची हातावर थापून पारी करून घ्यावी. 



या पारित सारण भरून त्याची करंजी करून घ्यावी. 




प्रेशरकुकर मध्ये पाणी गरम करत ठेवावे. 

त्यात चाळणी ठेवून हळदीची पाने ठेवावीत. 



यावर सर्व करंजा ठेवाव्या. ठेवताना एकावर एक ठेवू नये नाहीतर त्या फुटतात. 



वरून एखादी प्लेट ठेवावी वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. 



१०-१५ मिनिटे मिडीयम हाय ग्यासवर शिजू दयावे.  




Related

Sweets 2371932154930573358

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item