भरली मिरची । Bharli Mirchi


वेळ :  
३०मिनिटे, 
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१) ६-८ मध्यम आकाराच्या मिरच्या 
२) १ छोटा चमचा ओलं खोबर
३) ६ मोठे चमचे चण्याच पिठ   
४) १ छोटा चमचा लाल मिरची पूड 
५) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड 
६) तेल 
७) हळद 
८) कोथिंबीर 
९) आवडीनुसार मिठ 

कृती :

मिरच्या स्वच्छ धवून एका स्वच्छ कापडाने फुसून घ्याव्या. 

मिरच्यांना मधून काप दयावे, पूर्ण चिरू नयेत नाहीतर सारण भरता येणार नाही. 

सारण बनवण्यासाठी एका चण्याच पिठ, लाल मिरची पूड, हिरव्या मिरच्या, जिरे  व धणे पूड, हळद, कोथिंबीर बारीक चिरून  एकत्र करून घ्यावे. 


एका भांडयात तेल गरम करून त्यात खोबर थोडस परतून त्यात वरील चण्याच्या पिठाचे सारण घालून २-३ मिनिटे परतावे.

सारणात मिठ घालावे. 

एक  एक मिरची घेऊन सारण त्यात भरावे. 

एका भांडयात तेल गरम करून त्यात ह्या मिरच्या अलगदपणे एक एक करून सोडाव्या. 

भांडयावर झाकण ठेवून मंद ग्यासवर मिरची शिजू दयावी. 

शिजल्यावर उरलेले सारण वरून घालून ते हि भाजून घ्यावे. 

डाळ भातासोबत तोंडी लावयास द्याव्यात. 

Related

Vegetables 4679096747720033317

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item