तांदुळाची खीर | Rice Kheer

वेळ :  

१ तास ,
२-३ व्यक्तींसाठी . 

साहित्य :

१) १ लिटर साईसकट दूध   
२) १/२ छोटा चमचा तूप  
३) १/४ कप बासमती तांदूळ 
४) ५-६ छोटे चमचे साखर   
५) ३-४ वेलच्यांची पूड  
६) ४  बदाम व   काजू प्रत्येकी 
७) एक चिमुठ केशर 

































कृती :

तांदूळ स्वच्छ  धुवून  ३० मिनिटे भिजू घालावे. 

एका भांडयात तूप गरम करावे . 

भिजवलेल्या  तांदुळातले  पाणी काढून  हे  तांदूळ  २-३ मिनिटे  गरम तुपावर भाजून घ्यावे. 

अगदी लालसर भाजू नयेत.  फक्त पाणी सुकेपर्यंत भजावे. 

दुसऱ्या  बाजूला दूध गरम करावे  चांगले उकळू दयावे. 

उकळी आल्यावर ग्यास मंद करून  भाजलेले तांदूळ  त्यात घालावे . 

एकसारखे  ढवळत राहावे . 

तांदूळ शिजेपर्यंत  आणि दूध आहे  त्यापेक्षा  अर्धे  होईस्तोवर  सतत ढवळत राहावे. 

भांडयाला  खाली  लागणार नाही  याची  काळजी घ्यावी. 

या सर्व  कृतीसाठी साधारण ३०-३५ मिनिटे लागतात . 

तांदूळ शिजल्यावर  व दूध चांगले  आटल्यावर  साखर , वेलची  पूड, केशर  व काजू बदाम ची काप  घालावी. 

अजून ५ मिनिटे  चांगली उकळू  दयावी. 

आता  ग्यास वरून   बाजूला  करून   थंड  करावी . 

ही  खीर  थंड  किंवा  गरम  आवडीनुसार  खावयास  दयावी. 




Related

Sweets 3810412811130093

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item