कढी गोळे | Kadhi Gole

Kadhi Gole in English
वेळ:  
२०मिनिटे,
 व्यक्तीन साठी.

कढीचे साहित्य :
)  २ वाटया दही
२) १छोटे चमचे चण्याचे पिठ
)  ४ छोटे चमचे आलं लसुन पेस्ट 
)   हिरव्या मिरच्या
)  / चमचा लिंबू रस  
६)  कोथिंबीर 
७)  जिरे  
८)  मोहरी 
९)  कढीपत्त्याची पाने 
१०) २ चिमटी हिंग  
११) हळद 
१२) मिठ  चवीनुसार 
१३) १ चमचा साखर 
१४२चमचे तेल 

गोळ्याचे साहित्य:

१) चण्याची डाळ १ वाटी
२) १ छोटा चमचा आलं लसुन 

३) ४ हिरव्या मिरच्या 
४) जिरे 
५) कोथिंबीर 
६) हळद 
७) मिठ आवडीनुसार 



गोळ्याची कृती :

चण्याची डाळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजू घालावी. 

३-४ तासानंतर डाळीमधून पाणी काढून घ्यावे.  

मिक्सरला चण्याची डाळ,आलं लसुन, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या लावून जाडसर वाटून घ्यावे. 


वाटताणा पाणी घालू नये.  नाहीतर मिश्रण पातळ होते व गोळे कढीमध्ये विरघळतात.

या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. 

कढीची  कृती :

एका  भांडयात तेल गरम करावे.  त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता , हिरवी मिरची, हिंग व आलं लसुन पेस्ट घालून छान फोडणी तयार करावी. 

दही व चण्याचे पिठ एकत्र करून रवीने छान फेटून घ्यावे. 

हे दही फोडणीवर घालावे आणि उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहावे.  नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते. 

एक उकळी आली की हळूहळू गोळे त्यात सोडावे. 

आधी एक गोळा सोडून पाहावा तो जर फुटला नाहीतर उरलेले गोळे कढीत सोडावे. 

भांडयावर झाकण ठेवून मंद ग्यासवर ५ मिनिटे कढी उकळू दयावी. 

गोळे  शिजले कि ते वर येतात. 







Related

Vegetables 5811941910502079213

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item