शेवयांची खीर - Shevayachi Kheer

Vermicelli Kheer ( शेवयाची खीर ) in English


वेळ :  
३०मिनिटे , २ व्यक्तीन साठी .

साहित्य :

१)१ वाटी शेवया 
२)१/२ टिस्पून तुप
३)४ कप दुध
४)१/४ वाटया साखर
५)३-४ वेलची पुड
६)४ छोटे चमचे बदाम,काजू.

कृती:

एका पातेल्यात तुप वितळेपर्यंत गरम करावे. त्यात शेवया घालुन छान गुलाबी होयीस्तोवर भाजुन घ्याव्यात.

लालसर भाजू नयेत.

भाजुन झालेल्या शेवया बाजुला काढुन ठेवाव्यात.

पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे. मध्येमध्ये चमच्याने ढवळत राहावे.

बदाम,काजूचे पातळ काप करून घ्यावे.

वेलचीची पुड करुन दुधात घालावी. 

एक उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया व साखर घालावी. आवश्यक वाटल्यास झाकण ठेवुन शेवया शिजू द्याव्यात.

दुध आटुन शेवया शिजल्यावर ग्यास वरून बाजूला करुन बदाम व काजू घालवे.

हि खीर गरम वा थंड आवडीनुसार खाता येते.





Related

Sweets 9118020719626475532

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item