शंकरपाळी


वेळ  :  

२० मिनिटे 

साहित्य:

१) १/२ कप तूप  
२) १/२ कप साखर    
३) १/२ कप दुध 
४)  १/२ चमचा वेलची पूड 
५) अडीच कप मैदा 
६) तेल तळण्यासाठी  
७) एक चिमुठ मिठ 

कृती :

एका भांडयात तुप, दूध आणि साखर एकत्र करून  घ्या.  

साखर वितळेपर्यंत ढवळत राहा. 

एकदा साखर वितळली कि त्यात मैदा, वेलची पूड आणि मिठ घालुन पिठ चांगले मळून घ्या. 
आणि १५-२० मिनिटे झाकून ठेवा. 


या पिठाचे एकसारखे गोळे बनवून पोळपाटावर  पोळी लाटून घ्यावी . 

थोडेशी  जाडसर ठेवावी. 

चाकूच्या सहाय्याने याचे चौकोनी तुकडे पाडावे . 


एका बाजूला तेल गरम करून त्यात हे तुकडे तळून घ्यावे. 

सोनेरी रंग आला कि तेलातून काढून एका पेपरवर काढावे  म्हणजे जास्तचे तेल निघून जाईल. 

थंड झाल्यावर एका हवाबंद डब्ब्यात ठेऊन दयावीत. 






Related

Sweets 8362757647906945516

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item