हिरव्या वाटाण्याचा भात

Vatana Bhat in English


वेळ :  

२० मिनिटे

२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)दीड वाटी तांदूळ बासमती    

२)पाव वाटी हिरवा वाटणा  
३)पाणी साधारण ३ वाटी 
४)१ मोठा कांदा 
५)हळद
६)५-६ कढीपत्त्याची पाणे 
७)आलं लसुन पेस्ट 
८)जिरा मोहरी १/२चमचा प्रत्येकी
९)एक चिमुठ हिंग 
१०)२ चमचे मालवणी मसाला 
११)फोडणीसाठी तूप २ चमचे 
१२)एक तमालपत्र
१३)४-५ मिऱ्या 
१४)कोथिंबीर 
१५)आवडीनुसार मिठ
१६)वरून घेण्यासाठी १/२ वाटी ओल खोबर  


कृती :

आधी तांदूळ स्वछ धुऊन त्यातले पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
कुकरमध्ये तुप गरम करावे त्यात फोडणीचे साहित्य घालावे. (जिर,मोहरी,हिंग,कढीपत्ता,तमालपत्र,आलं लसुनची पेस्ट)
नंतर तांदूळ घालुन चांगले परतावे. चांगले कोरडे करावे. नंतर त्यात हिरवे वाटणे घालुन चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी घालावे. मसाला व मिठ घालावे. 
एक उकळी आली कि कुकरचे झाकण लावून साधारण १ किंवा २ शिट्या काढाव्यात. 
कुकर थंड झाला कि वरून छान कोथिंबीर व खोबरे घालावे.  






Related

Rice 6439129358713039209

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item