श्रीखंड । Shrikhand

Shrikhand in English

वेळ :  
१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.




साहित्य :

१)सव्वा वाटी चक्का  
२)१/२ कप साखर 
३)१/२ टिस्पून वेलचीपूड
४)१/२ टिस्पून चारोळी, १ टेस्पून पिस्त्याचे आणि १ टेस्पून बदामाचे पातळ काप 
५) बारीक जाळीचे मोठे गाळणे 


कृती :

एका भांडयात चक्का घ्यावा. त्यात साखर घालावी आणि निट मिक्स करावे.

बारीक झाळीच गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन गाळण्यातून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा राहत नाही. आणि मिश्रण एकजीव होत. 

गाळलेल्या तयार श्रीखंडात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित मिक्स करावे. तयार श्रिखंड  एका भांडयात काढून फ्रीजमध्ये ठेवावे.

हे श्रीखंड पुरीसोबत छान लागत. 


चक्का  :

साहित्य:


१)३ वाटया घट्ट दही

२)१ सुती कापड

कृती:

कापडात दही घालून सर्व बाजू एकत्र करून गाठ बांधावी आणि टांगून ठेवावे, म्हणजे दह्यातील सर्व पाणी गळून जाईल. 


टांगलेले दही खाली टेकू देवू नये. मधेमधे थोडासा दाब देऊन पाणी बाहेर पाडावे म्हणजे पाणी लवकर गळून जाईल.

सर्व पाणी गळून गेल्यावर साधारण ७-८ तासांनी घट्टसर चक्का तयार होईल.





Related

Sweets 9083169008940926689

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item