कॉर्न पोहे | Corn Pohe

कॉर्न पोहे( Corn Pohe ) 

वेळ :  


१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.


साहित्य :

१)दगड़ी  पोहे २ वाट्या 
२)१वाटी पिवळे कॉर्न्स (मक्याचे दाने)
३)२ छोटे चमचे तेल 
४)१/२ चमचा जीरे 
५) १/२ चमचा मोहरी 
६)२ हिरव्या मिरच्या 
७) कढीपत्ता 
८)थोडीशी साखर 
९)हळद 
१०)कोथिंबिर
११)लिंबु 
१२)चवीनुसार मिठ 

कृती :

पोहे चांगले धुऊन  मिठ आणि हळद लाऊन १० मिनिटे ठेवावे.
नंतर एका कढ़ई मध्ये १/२चमचा तेल गरम करुण  त्यात कॉर्न्स घालून एक पाण्याचा हपका मारून,व चिमुटभर मिठ घालून झाकण लाऊन २-३मिनटे ठेवावे. 
नंतर एका भांड्यात उरलेलं तेल घालून फोडणीचे साहित्य घालावे. 
नंतर त्यावर कॉर्न्स घालून परतावे व पोहे  थोडेसे परतून झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.नंतर त्यात थोडीशी साखर आणि लिंबू रस घालावे. 
देताना कोथिबीर घालून द्यावे.  

टीप :


कॉर्न्स उकडताना मिठ घातल्यास कॉर्न्सना चांगली चव येते. 






Related

Breakfast 8072643813821890006

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item